हजारवाडीतील माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Ex Sarpanch of Hazarwadi and activists join Shinde group

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील हजारवाडी (पोफळज) येथील माजी सरपंचासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात आज (रविवारी) प्रवेश केला. माजी सरपंच दादासाहेब हाके, माजी उपसरपंच भाऊसाहेब उत्तम हजारे, ग्रामपंचायत सदस्य आप्पा हजारे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग हजारे, रवींद्र हजारे, प्रेमचंद हजारे, भाऊ हजारे, विलास वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे गटात प्रवेश केला. आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांचा फेटा बांधून स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, लव्हेचे माजी सरपंच विलास पाटील, ज्येष्ठ नेते वामनराव बदे, मकाईचे माजी संचालक रामचंद्र पवार, पोपळज सोसायटीचे चेअरमन राजाभाऊ पवार, कंदरचे पै. उमेश इंगळे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सोमनाथ रोकडे, हर्षल बागल, धनंजय मोरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *