शेलगावच्या सरपंचासह सौंदे, हिसरेतील आजी- माजी सदस्यांचा पाटील यांना पाठींबा

Sarpanch of Shelgaon along with grandmothers of Saunde Hisare and ex members support Patil

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगाव (क) चे सरपंच आत्माराम वीर, माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत वीर, भुजंग वीर, बाबुराव माने, अरुण काटोळे, मारुती वाघमारे यांनी तर सौंदेचे सरपंच जोतिराम लावंड यांच्यासह हिसरेचे माजी ग्रामपंचात सदस्य प्रकाश खरात, संजय राऊत, लक्ष्मण लोंढे व मिरगव्हाणचे उपसरपंच रामभाऊ ओहोळ, भागवत सुरवसे, सचिन लावंड, माजी ग्रामपंचायत सदस्य सोपान हाके, कालिदास डीसले, सोपान हाके, राजेंद्र सुरवसे, नाथराव सुरवसे, नागनाथ सुरवसे, बालाजी सुरवसे, भिमराव सुरवसे, शिवाजी पवार, लक्ष्मण पवार, रामदास शिंदे, लक्ष्मण शिंदे, बाळू शिंदे, सोमनाथ शिंदे, सचिन शिरसाट, संभाजी शिरसाट, वसंत ओहोळ, बापूराव मोहोळ, अमोल सुरवसे, आबा सुरवसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शेलगाव (क) येथे प्रचार सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीधर पाटील होते. मंचावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, माजी सरपंच पोपट पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता सरडे, माजी सरपंच भास्कर भांगे, संजय गुटाळ, चंद्रकांत अंबारे, राजू भोसले, अंकुश शिंदे, आबासाहेब अंबारे, नाना गोडगे, शहाजी राऊत, अविनाश सरडे, टिंकू सरडे, तानाजी नीळ, गणेश घोरपडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद गरड यांनी तर आभार संदीप पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *