We are with Narayan Patil stay with us MLA Rohit Pawar

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आम्ही आबांबरोबर आहोत तुम्हीही बरोबर रहा. करमाळ्यात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत आहे. त्यात काही उमेदवार म्हणतील मी अपक्ष आहे. पण तुम्ही सत्तेत मांडीला मंडी लावून बसलात’, असे म्हणत आमदार संजयमामा शिंदे यांना आमदार रोहित पवार यांना टोला लगावला.

करमाळ्यात माजी आमदार नारायण पाटील यांना विधानसभेसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पाठींबा दिला आहे. यावेळी आमदार रोहित पवार, शंभूराजे जगताप, वैभवराजे जगताप, देवानंद बागल, डॉ. अमोल घाडगे, गणेश कवडे, सुभाष गुळवे, नवनाथ झोळ, सवितादेवी राजेभोसले आदी उपस्थित होते.

आमदार रोहित पवार म्हणाले…

  • आबांची लाडही ४० ते ५० हजार असेल
  • विरोधकांना साडेबारा कोटीची रसद पक्षाने पुरवली आहे आणखी दुसऱ्या पक्षातील उमेदवारालाही रसद येणार आहे
  • या लढाईत पुढे बलाढ्य ताकद आहे.
  • आपली लढाई ही भाजपविरुद्ध आपला पक्ष अशी आहे
  • देवेंद्र फडणवीस विरुद्ध आपली अशी ही लढत आहे
  • मराठा समाजाचे कार्यकर्ते उपोषणाला बसलले असताना त्यांच्यावर फडणवीस यांच्या आदेशाने लाठीचार्ज झाला.
  • धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते मात्र अजून ते आरक्षण मिळाले का?
  • छोटी- मोठी आंदोलने आमच्यासारखी गुजरात स्टाईलने लढावी, असे अमित शहा म्हणतात
  • काही उमेदवार म्हणतील मी अपक्ष आहे, असे म्हणतील मी अपक्ष आहे. पण तुम्ही सत्तेत मांडीला मंडी लावून बसलात, असे म्हणत आमदार शिंदे यांना त्यांनी टोला लगावला.
  • आपल्या आमदाराला चांगल्या लीडने विजयी करा
  • लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाहीत, त्यात आणखी सुधारणा केली जाणार आहे. दोन दिवसात आणखी एक योजना आपण जाहीर करत आहोत.
  • शेतकऱ्यांसाठीही आपण एक चांगली योजना आणत आहोत.
  • येथे अनेक नेते येऊन भाषणे करतील पण त्याकडे लक्ष देऊ नका
  • आताच्या लोकप्रतिनिधीने त्यांचा कारखाना विकला
  • हाळगाव कारखान्यात तुमचा ऊस आम्ही गाळप करू, एक एक टिपरू तुमचे गाळप करू

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *