करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊन गटातटाच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देणारे हे नेतृत्व आहे. त्यामुळेच तरटगाव येथील जाधव पाटील कुटुंब त्यांच्याबरोबर आहे. या कुटुंबाने नेहमीच समाजकारणातून राजकारण करण्याचे काम केले आहे. त्यामुळेच तरटगाव येथील ग्रामस्थ व तालुकावासियांचे मोठे पाठबळ त्यांना मिळालेले आहे.
स्व. डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असताना सर्वसामान्य शेतकरी कामगार यांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांचे लहान बंधू संतोष जाधव पाटील यांनीही सुरुवातीला आदिनाथचे संचालक म्हणून काम केले. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर ते आदिनाथ कारखान्याचे चेअरमन झाले व आदिनाथ कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून यशस्वी गाळप केले आणि कारखान्याला चांगले दिवस आणण्याचे काम केले. विकासाचे काम करणारे जाधव पाटील कुटुंब असून तरटगावची ग्रामपंचायत ही जाधव कुटुंबाच्या ताब्यात आहे. या ग्रामपंचायतीचे उपसरपंच अभिजीत जाधव पाटील हे आहेत. तर डॉ. रोहन जाधव पाटील हे वैद्यकीय सेवेत आहेत. त्यांचे सदैव पाठबळ असते.
तरटगावचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. याबरोबर परिसरातील शेती बागायत होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सुखी संपन्न झाला पाहिजे, असे स्व. डॉ. प्रदीप आबा जाधव पाटील यांचे स्वप्न होते. त्यांच्या निधनाच्या आधी 13 जून 2024 रोजी त्यांनी करमाळ्याचे विकासपीय आमदार संजयमामा शिंदे हे जाधव पाटील कुटुंबाकडे सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा आदरणीय डॉ. प्रदीप जाधव पाटील यांनी सर्व जाधव पाटील परिवाराच्या उपस्थितीमध्ये तरटगाव व संगोबा येथील सेना नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे जुने व खराब झाले असल्याने पाण्याचे गळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तरटगाव, अळजापूर, बिटरगाव (श्री), पाडळी, बाळेवाडी, कोळगाव, खांबेवाडी, पोथरे, निलज व ढेकळेवाडी येथील १० हजार हेक्टर क्षेत्र बंधाराच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे याबाबतीत कोल्हापूर बंधारे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्याची मागणी आमदार शिंदे यांच्याकडे त्यांनी केली होती.
आमदार शिंदे यांनी हे मागणे मान्य करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संगोबा व तरटगाव बंधाऱ्याचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून स्व. डॉ. आबांच्या मागणीला हे यश आले आहे. डॉ. आबांना याचा आनंद झाला असता. आबांनी दिलेला शब्द आमदार शिंदे यांनी पूर्ण करून दाखवला आहे. असा दिलेला शब्द पाळणारा व विकास कामासाठी सदैव कार्यतत्पर असलेले आमदार संजयमामा शिंदे हे खरे विकासाचे महामेरू आहेत. याचबरोबर पोटेगाव येथील बंधाऱ्याच्या कामाची मागणी करण्यात आली होती. ती ही पूर्ण करण्यात आली असून त्यासाठी ४ कोटी निधी मंजूर झाला आहे. तरटगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र प्रास्तावित आहे तेही काम लवकरच मार्गी लागणार आहे. आमदार संजयमामा शिंदे हे विकासप्रिय नेतृत्व असून मतदारसंघातील प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले आहे.
यामध्ये दहिगाव उपसासिंचन योजना, कुकडी उजनी उपसासिंचन योजना, सिना कोळगाव योजना यांना गती देण्याचे काम त्यांनी केले. दहिगाव योजनेचे थकित वीज बिल भरण्याचे काम त्यांनी केले आहे. आमदार शिंदे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधी आणण्याचे काम केले आहे. डिकसळ पूल, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला रिटेवाडी रस्त्याच प्रश्न त्यांनी सोडवला आहे. टेंभुर्णी- जातेगाव हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला असून या रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले आहे. आरोग्य सुविधेसाठी आमदार शिंदे यांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात 50 कॉट रुग्णालयाचे श्रीवर्धन करून १० खाटांचे करून सुविधा पूर्ण करण्याचे काम त्यांनी केले आहे. उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी 18 कोटी 68 लाख निधी मंजूर करून घेऊन ते काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत सिझर सुविधा सुरू करणे, दिव्यांकांना प्रमाणपत्र देण्याची सुविधा, डिजिटल एक्स-रे मशीन उपलब्ध करून देणे, कायमस्वरूपी भूलतज्ञाची नेमणूक तसेच दोन रुग्णवाहिका मतदारसंघासाठी त्यांनी दिल्या आहेत. शासन पातळीवर पाठपुरावा करून करमाळ्याचे वरिष्ठस्तर न्यायालय सुरू केल्यामुळे येथील नागरिकांनी गैरसोय दूर झाली आहे. आमदार शिंदे यांनी आपल्या दूरदृष्टीतून तालुक्याचे हित जोपासण्याचे काम केले आहे. कोणत्या गावात किती मतदान झाले व गटा- तटाचा संकुचित विचार न करता ज्या ठिकाणी काम करण्याची गरज आहे त्या ठिकाणी विकास कामे केली आहेत. करमाळा तालुक्यातील जनतेची मन जिंकण्याचे काम आमदार शिंदे यांनी केल्यामुळे करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार मामा व्हावेत, अशी जनतेची व आमची मनोमन इच्छा आहे.
- अजिंक्य संतोष जाधव पाटील