करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. अभिजीत लोंढे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील होते.
प्रा. लोंढे म्हणाले, भारतीय संविधानामुळे स्वातंत्र्याचा खरा अनुभव आपणास येत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिश्रमामुळे संविधानाची निर्मिती झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता यामुळे मानवी जीवन सुखी झाले. बाबासाहेबांमुळे मतदानाचा अधिकार श्रीमंत माणूस ते गरीब माणूस या सर्वांना समान मिळाला.
प्रा. डॉ. एल. बी. पाटील म्हणाले, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना विविध अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिले. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रमुख प्रा. प्रमोद शेटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वंदना भाग्यवंत यांनी केले तर आभार कृष्णा कांबळे यांनी मानले. प्रा. अनिल साळुंखे व प्रा. नितीन तळपाडे यावेळी उपस्थित होते.