करमाळा (अशोक मुरूमकर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका शिवसेना (शिंदे गट) पूर्ण ताकदीने लढणार असून शिवसैनिकांना यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना शिवसेना आढावा बैठकीत देण्यात आल्या आहेत. मुंबईत (ठाणे) आज शिवसेनेची आढावा बैठक झाली. या बैठकीला दिग्विजय बागल यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे उपस्थित होते.
आनंद आश्रम येथे ही बैठक झाली आहे. शिवसेना नेते खासदर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. पक्षप्रमुख काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार असून सर्व शिवसैनिकांना सज्ज राहण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना करमाळा तालुका प्रमुख म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी आशिष गायकवाड, संजय शिलवंत आदी उपस्थित होते.