करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वे मार्गावरील जेऊर स्थानकावर शुक्रवारी (ता. १३) मुंबई येथील मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर येणार आहेत. ते जेऊर रेल्वे स्थानक अमृतभारत याची पाहणी व तपासणी करणार आहेत, असे सांगितले जात आहे. साधारण दीड तास ते जेऊर रेल्वे स्थानकावर असणार आहेत. करमाळा तालुक्यातील केम, पारेवाडी या स्थानकावर अनेक दिवसांपासून गाडयांना थांबा देण्याची मागणी प्रवाशांची आहे. जेऊर रेल्वे स्थानकावर देखील आणखी एक्स्प्रेस रेल्वे गाडयांना थांबा मिळावा अशी मागणी प्रवाशांची आहे. याकडे लक्ष दिले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जेऊर रेल्वे स्थानकाची मुंबई येथील मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर करणार पहाणी
