राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीवाय देशभरातील प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदान येथे हा शपथविधी सोहळा झाला.
विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बहुमत मिळाले होते. यामध्ये भाजपचे फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे व पवार यांनी शपथ घेतली आहे. या शपथविधीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.