अमरावती येथील कलाजीवन बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने देण्यात येणारा ‘महाराष्ट्र भूषण 2024’ हा पुरस्कार निंभोरेचे तात्यासाहेब कळसाईत व गोरख कळसाईत यांना देण्यात आला. पुण्यातील पत्रकार भवन येथे डॉ. अलका नाईक व डॉ. युवराज ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. परळी वैजनाथचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, संजय कुलकर्णी, सारंग बालंगे, कल्पना तोडकर आदी यावेळी उपस्थित होते.
तात्यासाहेब कळसाईत यांनी शेतीमध्ये उपयोगी अनेक अवजारांचे संशोधन केले असून जेऊर येथे त्यांचा श्रीनाथ इंजीनियरिंग वर्क्स या नावाचे शेती अवजारे बनवण्याचा वर्कशॉप आहे. स्वतः संशोधन व प्रगत तंत्रज्ञान वापरून कृषी क्षेत्रासाठी आवश्यक ऊस लावणी यंत्र, उसाची आंतरमशागत व खत पेरणी यंत्र सर्व प्रकारची पेरणी यंत्रे याचे संशोधन करून अवजारांची निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेल्या अनेक अवजारांची दक्षिण आफ्रिका व फिलिपाईन्समध्ये निर्यात केली आहे. याबरोबर सर्व प्रकारच्या ट्रॅक्टरसाठी लागणारी अवजारे ते तयार करतात. सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. कोरोना काळात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले. पोलिस नाकाबंदीसाठी मोफत बँरेकेट्स पुरवठा केला. त्यांना सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘श्रीमंती सोलापूरची’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राज्यस्तरीय ‘वसंतराव नाईक कृषि प्रेरणा’ पुरस्कारही त्यांना देण्यात आला आहे. इन्स्पायर नॅशनल अवॉर्ड देखील देण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारतेवेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती माया कळसाई, संदीप टाकसाळ उपस्थित होते.