करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थीनी आश्लेषा बागडे हिने कर्नाटक (बेंगलोर) येथे झालेल्या सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये यश मिळवले. ती बीए भाग- २ मध्ये शिकत आहे. ५७ किलो वजनगटामध्ये तिने रौप्यपदक प्राप्त केले.
नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये पहिल्या राऊंडमध्ये केरळच्या अमृतावर मोळी डावावर दहा झिरोच्या फरकाने विजयी सलामी दिली. दुसऱ्या राउंडमध्ये बिहारची अनुपमारीवर सुद्धा दहा झिरोने मात करून कॉटर फायनलमध्ये प्रवेश केला. कॉटर फायनलमध्ये सामना झाला तो दिल्लीच्या नेहा कुमारीबरोबर! नेहा कुमारीवर चमकदार तिच्यावर दहा झिरोच्या फरकाने मात करून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. सेमी फायनलमध्ये तिची लढत मध्य प्रदेशची कुमारी हंसाबेन सोबत झाली.
या लढतीमध्ये चितपटीने विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये प्रवेश झाला तो हरियाणाची इंटरनॅशनल कुस्तीपटू तपस्वी बरोबर अखेरच्या अटीतटीच्या सामन्यांमध्ये आश्लेषाला अवघ्या दोन गुणांनी पराभव पत्करावा लागला. परतु तिने सिल्वर मेडल पटकवून महाराष्ट्राचे नाव उज्वल केले. तिला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. राम काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.