करमाळा (अशोक मुरूमकर) : येथील तहसील कार्यालयाच्या मागे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु झाले आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (MSIDC) वतीने (मुंबई) हे काम सुरु आहे. यासाठी १ कोटी ४७ लाख निधी मंजूर असून १२ महिन्यात याचे काम पूर्ण करयाचे आहे. हे काम झाल्यानंतर नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे.
करमाळ्यात निवडणूक कालावधी व एखादे आंदोलन असेल तर तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वारे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असते. त्यामुळे नागरिकांची दुय्यम निबंधक कार्यालयातील कामे होत नव्हते. तहसीलच्या आवारातच हे कायार्लय होते. त्यामुळे ही गरसोय होतहोती. मात्र आता हे कार्यालय झाल्याने कार्यलयनी कालावधीत सेवा मिळणार आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या काळात या कार्यालयाला निधी प्राप्त झाला होता. आता हे काम सुरु झाले आहे.
करमाळा तहसील कार्यालय व भूमिअभिलेख यांच्यामध्ये हे काम सुरु झाले आहे. सध्या त्याच्या कॉलमसाठी खड्डे खोदण्यात येत आहेत. या कामासाठी पुण्यातील मक्तेदार नेमण्यात आला आहे. या कामाची निविदा रक्कम १ कोटी ४७ लाख आहे. हे काम सुरु झाल्याने नागरिकांमध्ये समाधान निर्माण झाले आहे. करमाळा तहसील कार्यालयाची इमारतीही नव्याने बांधण्यात येणार आहे. मौलालीमाळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले होते. मात्र आता ते काम कोठे होणार याचीही उत्सुकता निर्माण झालेली आहे. भूमिपूजनापासून हे कायार्लय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.