करमाळा (सोलापूर) : करमाळा आगारातील एसटी बस चालक व वाहकाने एका महिलेची विसरलेला सोन्याच्या दागिन्यांची पर्स परत केली आहे. या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून आगर प्रमुख श्री. होनराव यांच्या उपस्थितीत संबंधित महिलेला दागिन्यांची पर्स परत दिली आहे. आज (मंगळवारी) प्रतिभा हेंद्रे (रा. बारामती) या करमाळा- मुंबई एसटी बसने प्रवास करत होत्या. त्यांची सोन्याचे दागिने असलेली पर्स विसरली होती. दरम्यान करमाळा आगाराचे चालक जितेंद्र भोसले व वाहक आत्माराम कुंभार यांनी प्रामाणिकपणे ती परत केली आहे.
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४