करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत असला तरी त्याला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आमचे नेते आमदार नारायण पाटील हे प्रयत्न करतील. त्यामुळे ते या निवडणुकीत ज्याला संधी देतील त्यांच्या पाठीमागे आम्ही उभा राहणार आहोत. त्यांच्या पॅनलमध्ये मला संधी दिली तर मी ही निवडणूक लढणार आहे, असे मत पाटील गटाचे युवा नेते रविकिरण फुके यांनी व्यक्त केले आहे.
करंजे येथील फुके यांनी सालसे ऊस उत्पादक गटातून पाटील गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते पाटील गटाचे समर्थक आहेत. नेत्यांचा आदेश मानत त्यांनी या निवडणुकीत अर्ज दाखल केला आहे. आमदार पाटील यांच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण या निवडणुकीत अर्ज दाखल केला आहे. त्यांचा ऊस हार्वेस्टर असून शेतकऱ्यांच्या मदतीला ते नेहमी धावतात. या भागातील पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. संधी मिळाल्यास शेतकरी सभासदाच्या हितासाठी व आदिनाथ कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
फुके म्हणाले, आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत असला तरी त्याला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, आमदार रोहित पवार, आमचे नेते आमदार नारायण पाटील हे प्रयत्न कारणार आहेत. त्याचबरोबर मार्गदर्शक प्रा.अर्जुनराव सरक, युवा नेते राजु पाटील, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, नवनाथ झोळ, देवानंद बागल यांनी संधी दिली तर मी ही निवडणुक लढवणार आहे.