आमच्या परिवाराची आन, बान, शान म्हणजे विधानपरिषदचे सभापती प्रा. राम शिंदे! नुकतीच त्यांनी माझ्या मुथानगर स्थित निवासस्थानी भेट दिली. सद्यस्थितीत प्रा. शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकिय आणि सामाजिक क्षितिजावरील रुबाबदार आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व आहे. निवासस्थानी आगमन झाल्यानंतर सत्काराचा शिष्टाचार आटोपला आणि मंग काय? साहेबांनी परिवाराशी आणि उपस्थितांशी मनमोकळ्या गप्पा मारायला सुरुवात केली.
अगदी सायकलवरून सर न होणारा पोथरे- करमाळा रोडवरील जोडनिंबाचा चढ, दिवसाही भीती वाटणारा केकताडाचा रस्ता, करमाळ्यातील तत्कालिन सुप्रसिद्ध सागर आणि योगेश सिनेमा टॉकीज, भाड्याने मिळणाऱ्या सायकली, शाळेच्या बाहेर मिळणारी गारीगार आदी गोष्टी 40 वर्षांनंतर पुन्हा पुनर्जीवित झाल्या.
साहेबांचे मनमोकळे बोलणे सर्वांच्याच मनाला भावणारे आणि साहेबांच्या संघर्षमय जीवनाची साक्ष देणारे होते. आमच्या घरात चाललेल्या या चर्चेतून कधी हास्य फवारे निघत होते तर कधी साहेबांच्या हृदयातून निघालेली काळीज चिरणारी एकदी गोष्ट वातावरण गंभीर करून डोळ्यांच्या कडा नकळतपणे ओल्या करत होती. किती संघर्ष? आणि तोही एकट्याच्याच वाट्याला आणि तरीही स्वतःला सर्व पातळ्यांवर सिद्ध करावं तर ते फक्त साहेबांनीच. प्रचंड प्रेरणा, ऊर्जा आणि आत्मिक सामर्थ्य देणारी ही भेट!
मी माझा परिवार आणि उपस्थित सर्वानाच जीवन प्रवासात यशस्वी मार्गक्रमण करण्यास नक्कीच सहाय्यभूत ठरेल. गप्पा संपत नव्हत्या. पुढच्या नियोजित कार्यक्रमाची वेळ आधीच पाऊण तासाने पुढे गेली होती. शेवटी मीच साहेबांना पुढच्या कार्यक्रमाची आठवण करून दिली आणि मंग साहेबांनी आवर्जून माझे वडील, आई, पत्नी, दीदी आणि आमचा दादा या सर्वांची प्रचंड आपुलकीने चौकशी करून पोथरे गावी मार्गक्रमण केले. मनासारखा राजा आणि राजासारखे मन.!
- आदर्श शिक्षक हरीश कडू, पोथरे (ता. करमाळा, जि. सोलापूर)