करमाळा (सोलापूर) : ‘तू भाचीला का बोलू देत नाही’ असे म्हणत मारहाण केली असल्याचा प्रकार केम येथे घडला आहे. यामध्ये दोघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. साहिल मुलाणी व राजू सायबू मुलाणी (दोघे रा. केम) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मंगळवारी (ता. ८) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी त्याच्या दुकानासमोर असताना गुन्हा दाखल झालेले संशयित त्याच्याकडे आले. त्यांच्या हातात लाकडी काठी होती. त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना शिवीगाळ का करता असे विचारले तेव्हा त्यांनी तू भाचीला का बोलू देत नाही म्हणत मारहाण केली. त्यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.