करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता कुंभेज फाटा येथे सुप्रीम मंगल कार्यालयात ‘खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक’ होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांनी केले आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना या बैठकीत खरीप हंगामाच्या तयारीसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.