करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात कै. नामदेवराव जगताप उर्दू विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.
करमाळा शहरातील नगरपालिकेच्या कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेचा निकाल पहिल्याच प्रयत्नात १०० टक्के लागला आहे. यावर्षी दहावीच्या परिक्षेला १४ विद्यार्थी बसले होते. यामध्ये मिस्बा कुरेशी 88 टक्के, सबिया शेख 85 टक्के व रफिया शेखला 77 टक्के गुण मिळून क्रमशः प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत. विद्यालयाचे मुख्याध्यापक जुबेर जानवडकर, प्रा. इब्राहिम मुजावर, मौलाना मोहसीन, मुफ्ती अबुरेहान, जामा मस्जिदचे मौलाना अन्वर, नुरानी मस्जिदचे मौलाना मरगबुल हसन, कलीम काझी, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, अर्बन बँकेचे माजी संचालक फारुख जमादार आदींनी अभिनंदन केले.