टेंभुर्णी (ता. माढा) येथील रिलस्टार गणेश भानवसेनी सायकलवरून तीन देश व तब्बल ३ हजार २०० किलोमीटर प्रवास केला आहे. काल झरे फाटा परिसरात तो आला होता. तेव्हा जेऊरवाडी येथील योद्धा करिअर अकॅडमीमध्ये त्याचा सन्मान झाला. त्याने संपूर्ण प्रवास उलगडला. निरर्थक किंवा फक्त मनोरंजनात्मक रिल न करता आपल्या सहासी प्रवासाचे अनुभव ठिकठिकाणचे लोकजीवन रिल्सच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या गणेशचा प्रवास थक्क करणार आहे.
माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ असलेल्या लगोर्णी येथील गणेशने आजपर्यंत सायकलवरून हजारो किलोमीटरने प्रवास केला. त्याने जम्मू काश्मीरसह उत्तर भारत, नेपाळ, भूतान, तिबेट असे तीन हजार दोनशे कालोमीटर प्रवास करून आला आहे. तो सोशल मिडीयावर सक्रिय असून एमएच 45 सायकल रायडर या नावाने त्याचे पेज आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर त्याचे १० लाखांपेक्षा जास्त चहाते आहेत. तो प्रवासाला निघाल्यापासून ठीक ठिकाणी छोटे- छोटे रिल्स बनवून सोशल मीडियावर वायरल करत असल्याने तो ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्याचे स्वागत झाले.
प्रवासात अनेक ठिकाणी त्याला या लोकांनी सहकार्य केले. महाराष्ट्राबाहेबरही अनेक ठिकाणी महाराष्ट्रीयन लोकांनी आवर्जून थांबून त्याची विचारपूस केल्याचे त्याने सांगितले. त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांची विशेषतः युवकांची मोठी गर्दी होत होती. नवनाथ नाईकनवरे यांच्या जेऊरवाडी येथील योद्धा करिअर अकॅडमीमध्ये त्याचा मोठा सन्मान करण्यात आला यावेळी अकॅडमी मधील तरुणांना त्याने मार्गदर्शन केले.