करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कोजनरेशनच्या एका ट्रान्फर्मरला आग लागलची घटना समजत आहे. यातील तारेची चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटयांनी ही आग लावली असल्याची चर्चा आहे. आज (शनिवारी) मध्यरात्रीच्या सुमारास सुरक्षारक्षकाला धूर दिसल्याने हा प्रकार लक्षात आला असे सांगितले जात आहे. यामध्ये किती नुकसान झाले याचा आकडा अजून पुढे आलेला नाही. मात्र यामध्ये पोलिसांकडे तक्रार देण्याचे काम सुरु आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत आहे. या कारखान्याची दोन महिन्यापूर्वीच निवडणूक झाली आहे. त्यामध्ये आमदार नारायण पाटील यांची सत्ता आली असून सध्या या कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. कारखाना सुरु करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु असतानाच या कारखान्याच्या कोजनरेशनच्या ट्रान्सफार्मला तारेच्या चोरीच्या उद्देशाने आग लावली असल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार नेमका कोणी केला आहे, हे समजेलेले नाही. मात्र घटनस्थळाची पहाणी करण्यासाठी पोलिस गेल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.
आदिनाथ कारखाना हे शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदिर आहे. हा कारखाना सुरु होणे आवश्यक आहे. या कारखान्यावर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. कारखाना सुरु झाला तर शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे हा कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न आमदार पाटील यांचा आहे. त्यात आग लावून तारेची चोरी करण्याचा प्रयत्न झालाच प्रकार समोर आला आहे. तपासानंतर यांचे खरे कारण समजणार आहे.