करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका कृषी कार्यालयास आयएसओ नामांकन मिळाल्याबद्दल तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी सन्मान केला. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून समस्यांना सोडवल्या जात आहेत. खरीप हंगामामध्ये बी बियाणे शेतकऱ्यांना मिळावे म्हणून प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर अधिकारी उपस्थित होते. माती परीक्षण सेंद्रिय शेतीचे महत्व समजून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. करमाळा तालुका केळी उत्पन्नामध्ये सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर आहे. कृषी अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी यांच्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कृषी अधिकारी चव्हाण म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाशी संपर्क साधून अडचणी मांडाव्यात आम्ही सोडवण्यास समर्थ आहोत.
करमाळा तालुका कृषी कार्यालयास ISO नामांकन मिळाल्याबद्दल चव्हाण यांचा सन्मान
