करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात बेकायदेशीरपणे रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडे ठेवणाऱ्यांना पोलिसांनी झटका दाखवला आहे. तीन दुकान चालकांवर नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांना आज (बुधवारी) करमाळा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने दंड आकारला आहे.
पोलिस निरिक्षक रणजित माने यांच्या मार्दर्शनाखाली ‘ऑल आऊट ऑपरेशन’ दरम्यान करमाळा शहरात पोलिसांना तीन हॉटेल रात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करत सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री ही कारवाई झाली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा त्यांच्यावर प्रत्येकी 1250 रुपयेचा दंड आकारण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संदेश चंदनशिवे, पोलिस हवालदार भाऊसाहेब शेळके व सुशीलकुमार पाखरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यापुढेही करमाळा शहरात व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य कोणीही करू नये. नियमांचे पालन करत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आली आहे.