करमाळा : टेंभुर्णी- जातेगाव महामार्गावरील देवळाली ग्रामपंचायतीकडून वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा दिल्या जाणार आहेत. याची पहाणी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली.
सरपंच पोपट बोराडे म्हणाले, ‘या रस्त्यावरून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी पाणी व्यवस्था, मालीश व्यवस्था, दवाखान्याची व्यवस्था व केश कर्तन व्यवस्था केली आहे. यावेळी प्रकल्प संचालक ठोंबरे, गट विकास अधिकारी डॉ. अमित कदम, श्री. भोंग, उपायुक्त श्री लोकरे, सीआरपी येळवणे, ग्रामविकास अधिकारी श्री नागरसे व निकम यांच्यासह माजी सरपंच आशिष गायकवाड, बापु गुंड, गणेश पाटील, विलास चव्हाण, सुनील आवटे, सुनील कानगुडे, सुभाष कानगुडे, ऋषी गायकवाड उपस्थित होते.