बिटरगावमध्ये कृषी विभागाकडून ‘बांधावर नारळ लागवड’ची पूर्वतयारी सभा

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारचा १५० दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून ‘जिथे ऊस तिथे बांधावर नारळ लागवड’ कार्यक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातून वडगाव व बिटरगाव श्री या गावांची निवड झाली आहे. त्यातूनच बिटरगाव (श्री) येथे पूर्वतयारी सभा झाली. यामध्ये गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी करमाळा पंचायत समितीचे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सहायक कार्यक्रम अधिकारी हनुमंत राजपूत, तांत्रिक सहायक शिवकुमार यादव, सहायक कृषि अधिकारी दादासाहेब नवले, विजय सोरटे, रोजगारसेवक प्रवीण घोडके, पत्रकार अशोक मुरूमकर, सामाजिक कार्यकर्ते बबनराव मुरूमकर, सागर शिंदे, गजेंद्र बोराडे, माजी सरपंच श्रीहरी जाधव, सिद्धार्थ घोडके, रामदास मुरूमकर, वसंत भोसले, विश्वनाथ भोसले, आबासाहेब कुंभार, बाळासाहेब शिंदे, अतुल मुरूमकर, नितीन मुरूमकर, ज्ञानदेव माने, बलभीम दळवी, पांडुरंग मुरूमकर, दादा मुरूमकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *