माजी आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहर व ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविण्यात आले. माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रकृती स्वास्थ्यसाठी श्रीदेवीचामाळ येथील श्री कमलाभवानी चरणी प्रार्थना व आरती करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते देवीचामाळ येथील जगदंबा मूकबधिर निवासी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, ऍड. अजित विघ्ने, ऍड. नितीन राजेभोसले, भरत अवताडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर दुचाकी व चारचाकी वाहनांना मोफत पियुसी वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक रणजित माने उपस्थित होते. करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप व भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे व गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांच्या हस्ते पांजरपोळ गोशाळेत चारा वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *