करमाळा : महसूल दिनानिमित्त उपविभागीय कार्यालयच्या वतीने कुर्डूवाडीत आज (शुक्रवारी) उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला. यामध्ये उत्कृष्ट पोलिस पाटील म्हणून बिटरगाव श्री येथील पोलिस पाटील शोभा अभिमन्यू यांचा सन्मान झाला. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, उपविभागीय अधिकारी आव्हाड, करमाळ्याच्या तहसीलदार ठोकडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन हा गौरव करण्यात आला.
