करमाळ्यात आमदार पाटील यांच्या उपस्थितीत तहसीलदार ठोकडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तहसील कार्यालय येथे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन झाले. आमदार नारायण पाटील यांच्यासह करमाळा शहर व तालुक्यातील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते. पावसामुळे पोलिस मैदानात चिखल झाला होता. त्यामुळे कार्यक्रमावर मर्यादा आल्या. चिखलामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी व करमाळा पोलिसांनी मानवंदना दिला. यावेळी नागरिकांनी देखील चिखलात उभा राहून देशभक्ती दाखवून दिली.

करमाळा शहर व तालुक्यात गुरुवारी (ता. १४) मध्यरात्रीपासून पाऊस पडत होता. आज (शुक्रवारी) देखील पाऊस होता. सकाळी काहीकाळ फक्त पाऊस कमी झाला होता. पावसामुळे काही शाळांमधील देखील कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. करमाळा तहसील कार्यालयात ९.५ वाजता शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी पोलिस निरीक्षक रणजित माने, महसुलाचे नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, विजयकुमार लोकरे, शत्रगुण चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष वारे, सावंत गटाचे सुनील सावंत, माजी नगरसेवक पप्पू सावंत, अशपाक जमादार अभिषेक आव्हाड, माजी नगरसेवक अतुल फंड, सेवानिवृत्त नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, अरुणकाका जगताप, उपप्राचार्य संभाजी किर्दक, प्रा. लक्ष्मण राख यांच्यासह सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. शहरातील विद्यार्थ्यांनी शाळेतील ध्वजवंदन झाल्यानंतर पोलिस ठाण्यात शस्र व तुरुंग पहाण्यासाठी गर्दी केली होती. पोलिस बांधवानी त्यांना पोलिस ठाण्याबद्दल माहिती दिली. महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. तर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर पथनाट्य सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *