करमाळा (सोलापूर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांच्या हस्ते मिल रोलरचे पुजन करण्यात आले. कारखान्याचे संचालक रामचंद्र हाके, अजित झांजुर्णे, रेवन्नाथ निकत, विलास काटे, गणेश तळेकर, गणेश झोळ, आशिष गायकवाड, कार्यकारी संचालक, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दिगंबरराव बागल (मामा) यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन संचालक हाके यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याच्या मृत्यू झालेल्या कामगाराच्या वारसांना थकीत रकमेचे धनादेश देण्यात आले. कारखाना मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर वृक्षारोपण करण्यात आले.
अध्यक्ष भांडवलकर म्हणाले, ‘नेत्या रश्मी बागल, गटाचे नेते दिग्विजय बागल व माजी आमदार शामलताई बागल यांच्या मार्गदर्शनाखाली हा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरु केला जाणार आहे. कारखान्यातील मशिनरी दुरूस्ती व देखभालीची कामे वेगात सुरू असुन ऊस तोडणी व वाहतुक यंत्रणेचे करार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. कारखाना वेळेत सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा मानस असुन कारखान्याचे ४ ते ४.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ऊस गळीतास देवून सहकार्य करावे’.
लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र पोळ यांची निवड
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘कारखाना व्यवस्थापणाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आदा करण्याची कार्यवाही सुरू असुन सर्व कर्मचाऱ्यांनी पूर्ण योगदान देवून २०२५- २६ चा गळीत हंगाम यशस्विपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.’ कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी कारखान्याच्या अडचणीचे दिवस संपले असुन पुढील काळ हा सुवर्णकाळ’ असल्याचे सांगुन उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कामगार कल्याण अधिकारी बरडे यांनी मानले.
करमाळ्यात आज गोविंदांचा ‘थर’थराट! दत्तपेठमध्ये विशेष देखावा; उद्या जोत्सना सपकाळ, माजी खासदारांची राहणार उपस्थिती