इंदापूर : शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विद्या प्रतिष्ठानच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व मुक्ताई ब्लड सेंटरच्या वतीने प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले.
इंदापूर येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहन हेगडे, मुक्ताई ब्लड सेंटरचे चेअरमन अविनाश ननवरे, इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या डॉ. ज्योती जगताप, विद्या प्रतिष्ठान कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण संगिकर उपस्थित होते. डॉ. हेगडे म्हणाले, ‘रक्तदानाचे आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व विशद केले. नियमित रक्तदानामुळे अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचतात तसेच रक्तदान करणाऱ्याच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो’.
प्राचार्य डॉ. देशपांडे म्हणाले, ‘शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व सेवाभाव निर्माण करणे हीच खरी शिक्षणाची उद्दिष्टे आहेत. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये मानवतेची जाणीव निर्माण होते. महाविद्यालय समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील’. प्रस्ताविक महाविद्यालयातील एनएसएसचे समन्वयक प्रा. संतोष देवकाते यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. सचिन पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
