करमाळा (सोलापूर) : अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष भालचंद्र पाठक सर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी (ता. 30) दुपारी 3 वाजता यश कल्याणी सेवा भवन येथे शोकसभा होणार आहे. त्यांच्याविषयी आदर आणि प्रेम असलेल्या विविध क्षेत्रातील पदाधिकारी, मान्यवर, नागरीक, त्यांचे विद्यार्थी तसेच त्यांचे कुटुंबीयांवर प्रेम करणारे बंधू भगिनींनी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
