करमाळा (सोलापूर) : मंगळवार पेठेतील बारामती बँकेजवळ उभा केलेली एक मोटारसायकल चोरीला गेली आहे. यामध्ये शेलगाव वीराचे येथील ज्ञानेश्वर नामदेव जाधव (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. जाधव हे बिगारी काम करतात. मंगळवार पेठ येथे एका बांधकामावर ते होते. काम सुरु असल्याने त्यांनी बारामती बॅंकेजवळ मोटारसायकल उभा केली होती. चोरीला गेलेल्या मोटारसायकलला चावी नव्हती. किक मारली की ती डायरेक चालू होत. ५ तारखेला मोटारसायकल चोरीला गेली आहे.
मंगळवार पेठेतुन बांधकाम कामगाराची मोटारसायकल चोरीला
