करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने करमाळा तालुका काँग्रेस महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक महिला आघाडीच्या करमाळा तालुकाध्यक्षा रजनीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शहराध्यक्षा अरुंधती जगताप यांच्या उपस्थितीत झाली.
या बैठकीमध्ये पाटील म्हणाल्या, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत काम केले जाणार आहे. जातीयवादी सत्ता उलथून टाकून देशात सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीची सत्ता येणे गरजेचे आहे. त्यासाठी माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन केले जात आहे. जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शाहीन शेख व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शितलदेवी मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत करमाळा तालुक्यात पंचायत समितीच्या सर्व गणांमध्ये व करमाळा शहरात कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
‘आपल्या सर्वांची हमी… माढ्यातून एक कमळ कमी’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी काम करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
Loksbha election करमाळ्यात सोमवारपासून महायुतीच्या सभांचा धडाका! संपुर्ण तालुक्यात ‘असे’ असणार नियोजन
मोहिते पाटील समर्थकांकडून व्यक्तिगत भेटींवर भर, महाविकास आघाडीतील प्रमुखांनी सक्रीय होण्याची गरज
निंबाळकरांच्या प्रचारासाठी करमाळ्यात ‘व्हिडीओ व्हॅन’! आमदार शिंदेच्या हस्ते प्रचाराची सुरुवात
मोहिते पाटील यांच्यासाठी स्वतंत्र समांतर प्रचार यंत्रणा राबवणार : चिंतामणी जगताप