जेऊरमधील अल्पवयीन मुलाला आमिष दाखवत पळवून नेल्याचा प्रकार

करमाळा (सोलापूर) : जेऊर (गावडेवस्ती) येथील एका साडेसतरा वर्षाच्या मुलाला अनोळखी व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून पूस लावून पळवून नेले असल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत वडिलांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसात ६ जूनला गुन्हा दाखल झाला आहे.

४ जूनला हा प्रकार घडला होता. पूस लावून पळवून नेलेला मुलगा १२ वी उत्तीर्ण झाला आहे. त्याचे वडील ४ तारखेला सकाळी जेऊर येथे शेतीला खात आणण्यासाठी गेले होते. दुपारी साडेतीनच्या दरम्यान ते घरी आले तेव्हा त्यांचा अल्पवयीन मुलगा घरी नव्हता. त्याच्या आईने तो तासाला गेल्याचे सांगितले. मात्र तो घरी आला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. त्याला कोणीतीरी कशाचे तरी आमिष दाखवून पूस लावून पळवून नेल्याचा संशय असून यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *