करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथून एका अल्पवयीन मुलीला कशाचे तरी कारण सांगून पळवून नेले आहे. याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात संबंधित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
संबंधित मुलगी १७ वर्ष १० महिन्याची आहे. १२ तारखेला सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान संबंधित मुलगी श्रीदेवीचामाळ येथील घरी एकटीच होती. मुलीचे आई- वडील मोलमजुरीसाठी बाहेरगावी गेले होते. तेव्हा तिला अनोळखी व्यक्तीने कशाचे तरी कारण सांगून पळवून नेले आहे. आई- वडील घरी आले तेव्हा मुलगी घरात नव्हती. त्यांनी तिचा शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी तक्रार केली आहे. त्यावरून भारतीय दंड संहिता १८६० – ३६३ नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.