करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीला कशाचे तरी आमिष दाखवत पूस लावून पळवून नेल्याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला असून रविवारी (ता. ८) हा प्रकार घडला आहे. याचा पुढील तपास करमाळा पोलिस करत आहेत. संबंधित मुलगी एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून ती सतत कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होती. तिला आईने समजावून सांगितले होते. मात्र तिला कोणीतरी कशाचे आमिष दाखवून पूस लावून पळवून नेले आहे. मुलीच्या वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र सापडली नाही. त्यानंतर करमाळा पोलिसात ही फिर्याद देण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीला आमिष दाखवत पूस लावून नेले पळवून
