भाचीचे जावळ काढून मोटारसायकलवर निघालेल्या मामाची विहाळजवळ ट्रॅक्टरला धडक

A motorcycle collided with a tractor near Vihal

करमाळा (सोलापूर) : बहिणीच्या मुलीचे जावळ काडुन मोटारसायकलवर घराकडे निघालेल्या मामाची विहाळजवळ ट्रॅक्टरला धडक बसली आहे. हा अपघात १५ तारखेला सकाळी १० वाजताच्या सुमारास झाला आहे. यामध्ये एका अनोळखी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध रस्त्याच्या परस्थितीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

जेऊरवाडी येथील चेतन रामकृष्ण शिरस्कर (वय २५) हे विहाळ येथे बहिणीच्या मुलीचे जावळ काढण्यासाठी मोटारसायकलवर गेले होते. तेथून ते माघारी येत असताना कोर्टी ते करमाळा रस्त्यावर अचानक एक ट्रॅक्टर आला. त्याला त्यांची मोटारसायकल धडकली. यामध्ये त्यांच्या डोक्याला, छातीला, पायाला मार लागला आहे. त्यांना करमाळा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या गाडीचेही नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *