करमाळ्यातील छत्रपती चौक ते शेटफळ दरम्यान गुरुवारी निघणार मोटारसायकल रॅली

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेटफळ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गुरुवारी (ता. ३१) सकाळी ११ वाजता भव्य मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे. शिवजयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुकाच्या वतीने ही रॅली काढली जाणार आहे. शेटफळ येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्यानंतर प्रशासन व नागरिक यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. मात्र येथील पुतळा हटवल्यास मोठा उद्रेक होईल, अशी भावना शिवभक्तांची आहे. या भव्य रॅलीची तयारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. करमाळा शहरातील छत्रपती चौक येथून ही रॅली काढली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *