करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या मुंबई ते चेन्नई मार्गावरील जेऊर स्थानकावर करमाळ्यातील एकजण ठार झाला आहे. प्रमोद अर्जुन गोरे (वय अंदाजे 40, रा. फंड गल्ली) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या पायाला व कपाळाला गंभीर जखम झाली असून मृत्यूचे नेमके कारण समजले नाही. आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. हा रेल्वे आपघात असल्याचे बोलले जात आहे.
जेऊर रेल्वे स्थानकावर करमाळ्यातील एकजण ठार
