करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्ह्यात राजकारणातील चाणक्य, किंगमेकर, औद्योगिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामामुळे विलासराव घुमरे यांची ओळख आहे. करमाळा तालुक्यातील राजकारणात किंगमेकर म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या राजकीय चातुर्याने अनेक घडामोडी घडल्या आहेत. विकासाच्या राजकारणाची जाण असलेल्या विलासराव घुमरे सर यांच्या आयुष्यातील ‘या’ गोष्टींबाबत विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड व प्रा. प्रदीप मोहिते यांच्याशी झालेला ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलचा हा संवाद…
१) विद्या विकास मंडळाचे सचिव घुमरे हे यशवंत परिवाराचे आधारवड आहेत. घुमरे यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. गरिबांच्या समस्या काय असतात याची जाणीव त्यांना आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणे हा त्यांचा गुण आहे. त्यांचे शिक्षण करमाळा येथेच झाले. माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्याच महाविद्यालयात त्यांनी लिपीक म्हणून नोकरी सुरु केली. मात्र कष्ट आणि प्रमाणिकपणे काम करत त्यांनी तालुक्यातील शैक्षणिक विकासाचा दृष्टिकोन ठेऊन संस्था सर्वोच्च स्थरावर आणली. स्व. नामदेवराव जगताप, माजी मंत्री दिगंबरराव बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप व माजी आमदार शामल बागल यांच्या मदतीने यशवंत परिवाराच्या माध्यमातून काम केले. त्यांनी प्रत्यक्ष राजकारणात भाग घेतला नाही. पण अप्रत्यक्षपणे त्यांनी करमाळ्यात विकासासाठी भूमिका मांडत राजकारणाला आपल्याभोवती फिरवले. राजकारणातील स्थित्यंतराचा मध्यबिंदू म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही.
२) घुमरे सर यांचा शिक्षणाकडे पहाण्याचा आधुनिक दृष्टिकोन आहे. गरज ओळखून सर्वसामान्य विद्यार्थी डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी करमाळ्यात शैक्षणिक काम केले आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनीसाठी त्यांनी वसतिगृह सुरु केले. सध्या महाविद्यालयामध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य या शाखांमध्ये कनिष्ट व वरिष्ठ विभागांमध्ये शिक्षण दिले जाते. महाविद्यालयासमोर भव्य क्रीडांगण आहे. तेथे त्यांनी विशेष लक्ष देऊन सध्या रनिंग ट्रॅक सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. महाविद्यालयाचा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना विद्यार्थी कलाक्षेत्रातही मागे राहू नये हा त्यांचा दृष्टिकोन आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नव लौकिक कमावलेला ‘मदार’ चित्रपटाचा दिग्दर्शक मंगेश बदर हे याच महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. भावी काळात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विचारात ‘मास कम्युनिकेशन’ व ‘व्यवसायाभिमुख’ शिक्षण सुरु करण्याचा श्री. घुमरे सर यांचा मानस आहे.
३) घुमरे सर लहानपणापासूनच कष्टाळू आणि जिद्दी आहेत. त्यांना खेळाची आवड आहे. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांचा दिवस सुरु होतो. शारीरिकदृष्ट्या तंदरुस्त असावे म्हणून रोज व्यायाम करतात. साडेआठपर्यंत त्यांचा व्यायाम व मैदानावर गप्पागोष्टी सुरु असतात. त्यानंतर दिवसभरातील कार्यालयीन, आलेल्या व्यक्तींची व मित्रांची कामे व नियोजित कार्यक्रम सुरु असतात. सकाळी दहा व रात्री दहा वाजता त्यांचे जेवण असते. यामध्ये तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने कामे सुरु असतात. ते प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी असतात.
४) विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्याल अर्थात यशवंत परिवार हा त्यांच्या जीवनातील एक भाग आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना घुमरे सर आदर्श मानतात. त्यांच्याच नावाने हे महाविद्यालय आहे. त्यांच्याच नावाचा अनऔपचारिक परिवार म्हणजे यशवंतर परिवार! यामध्ये डीएड, कॉलेज, पतसंस्था, कला, विज्ञान व वाणिज्य शाखा या सह औद्योगिक क्षेत्रातील घटक व विद्यार्थी हे सर्व याच परिवारातील घटक आहेत. या परिवारातील सदस्याला बाहेर काढण्यासाठी घुमरे सर प्रयत्न करत असतात.
५) घुमरे यांना विक्रांत व आशुतोष ही दोन मुले आहेत. त्यांचा सुरुवातीपासूनच मुलांनी राजकारणाच्या सानिध्यात येऊ नये हा निश्चय होता. विक्रांतचे लंडन येथे शिक्षण झाले. ते वकील आहेत. दुसरा मुलगा आशुतोष हे उद्योजक आहेत. त्यांची एक कंपनी आहे. त्यांना दोन सुना आहेत. रुपाली या उच्च शिक्षित आहेत. त्या डॉक्टरेट आहेत. त्या हुके पाटील तर लहान सून या शिंदे कुटुंबातील आहेत. त्या निमगावच्या असून कोमल असं नाव आहे. घुमरे यांचा पेट्रोल पंप, विकी मंगल कार्यालय, महाविद्याल व कंपनीतील अधिकारी व कर्मचारी हेच त्यांचे कुटुंब आहे. जयश्रीताई या त्यांच्या सौभाग्यवती आहेत. कुटुंबात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. एक आदर्श कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
६) २१ वे शतक हे माहित व तंत्रज्ञानाचे आहे. सध्या स्वतःला सिद्ध करावेच लागते. मात्र यापूर्वीही घुमरे यांच्या व्यक्तिमत्वाने विलासराव घुमरे सर हे एक ब्रँड तयार झाले. हे ब्रँड स्वीकारण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू महत्वाचे आहेत. त्यांचे इम्प्रेशन हे राजबिंड आहे. अतिशय छान राहणे, भेदक नजर, आणि उत्तम संवाद कौशल्य त्यांचे आहे. सर शिकलेल्या, उच्च पदस्थ व कमी शिकलेल्या व्यक्तीशी अतिशय सैजन्याने राहतात. मंत्र्यांशी बोलतानाही त्यांची एक वेगळी छाप त्यांची पडते. हा व्यक्तिमत्वाचा गुण अनुभवामुळे आलेला आहे. त्यांचे अचूक नियोजन असते.
७) घुमरे सरांचा मित्रपरिवार हा खूप मोठा आहे. त्यांची कौटुंबिक परिस्थितीत ही हलाकीची होती. मात्र प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द यामुळे ते यशस्वी झाले. कुटुंबासाठी ते १८ व्या वर्षी नोकरीला लागले होते. तेव्हा त्यांचे काही मित्र सोलापूर, पुणे अशा ठिकाणी नोकरीला होते. काहीजण नोकरीच्या शोधात होते. तेव्हापासून त्यांनी मित्रांनाही मदत करण्यास सुरुवात केली. ५० वर्षांपासून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मित्रांचे संकलन केले आहे. गेल्यावर्षी त्यांनी सर्व मित्रांचा मेळावा घेतला होता. सर्व क्षेत्रात त्यांचे मित्र आहेत. व्याख्याते व कवी प्राचार्य सुरेश शिंदे, कवी व साहित्यक राजेंद्र दास हे त्यांचे मित्र आहेत. त्यांचा मित्रपरिवार हा मोठा असून त्यांचे वर्गमित्र हे सतत भेटत असतात. त्यांच्या मित्रत्वाला वयाची अट नाही.