यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात NEP अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या वतीने बी. ए. भाग २ अर्थशास्त्र व इतिहास आणि बी. कॉम. भाग २ या वर्गाच्या विषयाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार सुधारित अभ्यासक्रमावर विदापीठस्तरीय एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले, माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, दयानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय उबाळे, मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विजय उबाळे म्हणाले, ‘अभ्यासक्रम तयार करताना पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण कल्पना यांचा वापर करावा’. घुमरे म्हणाले, ‘स्पर्धात्मक युगात विद्यार्थी सक्षमपणे उभे राहण्यासाठी त्यास ज्ञानदान करणे आवश्यक आहे’. कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने म्हणाले, ‘नवतंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी नव्या आव्हानांना सामोरे जाणे गरजेचे आहे’. या कार्यशाळेस डॉ. विष्णू वाघमारे, डॉ. अमोल खाडे, डॉ. श्रीकांत दुधाळ, डॉ. शशिकांत शिंदे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रसंगी प्रा. डॉ. अनिल साळुंके म्हणाले, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होणार आहे.’

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य अनिल साळुंखे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख कृष्णा कांबळे, प्रा. डॉ. अंकुश करपे, प्रा. सुपेकर, इतिहास विभाग प्रमुख प्रा. सरला चव्हाण, प्रा. डॉ. बळीराम जाधव, प्रा. चारु देवकर, प्रा. हर्षद जाधव, प्रा. ऋषी माने यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. नितीन तळपाडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. विजया गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *