करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील झरे येथील तरुणाची कारचा पाठलाग करून मागून धडक देत पैशाच्या व्यहवारातून सिनेस्टाइलने खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी राशीन येथील एका संशयितांविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार काल (मंगळवार) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडला. तेजस संजय काळे (रा. कानगुडेवाडी, ता. कर्जत, जि. अनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. तर चंद्रशेखर उर्फ नाना रामदास जाधव असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. यामध्ये झरे येथील हॉटेल चालक सुभाष शंकर जाधव यांनी फिर्याद दिली आहे. हत्या झालेल्या चंद्रशेखरचे ते चुलते आहेत.
चंद्रशेखरचे राशीनमध्ये वॉशिंग सेंटर आहे. मंगळवारी (ता. 28) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास त्याचा मित्र पृथ्वीराज सतीश साळुंखे व ते पान खाण्यासाठी कारमध्ये जात होते. तेव्हा दोघेजण गाडीतून करमाळा चौकमध्ये आले. दरम्यान मित्र संशयित आरोपी तेजसला सागरने फोन करून तू कुठे आहेस? विचारले. त्यावर त्याने सागर हॉटेलच्या जवळ असल्याचे सांगितले. त्यानंतर पृथ्वीराज व चंद्रशेखर हे तेथे गेले. तेव्हा तेजस त्याची चारचाकी कार घेऊन तेथे थांबला होता. तेथे गेल्यानंतर मित्र विशाल मस्करचा फोन आला. त्यावर तो म्हणाला की ‘तुला काही बोलायचे आहे तू राशीन येथे करमाळा चौक येथे ये.’
तेव्हा ते पुन्हा माघारी निघाले दरम्यान मित्र तेजस हा चंद्रशेखरला मनाला तू थोड थांब मला तुला बोलायचे आहे. त्यानंतर चंद्रशेखर म्हणाला थांब मी पाच मिनिटात माघारी आलो, असे म्हणाला असता तेजसने सागर हॉटेल जवळ गाडी आडवी लावली. तेव्हा चंद्रशेखरनी गाडी बाजूने काढून करमाळा चौक येथून राशीनकडे येऊ लागले. तेव्हा तेजसने गाडीच्या मागे गाडी चालवून सोबत बोलू असे म्हणाला. दरम्यान चंद्रशेखर मनाला तू शांत बस मी पाहतो काय आहे ते असे म्हणून गाडी जोराने पळू लागला. त्यानंतर ते काळेवाडी चौकात आले तेव्हा चंद्रशेखरने मासाळ कॉलनी येथे गाडी घातली. त्यानंतर तेजसने पाठलाग करत पुन्हा काळेवाडी चौकात आला. त्यानंतर चंद्रशेखरने करमाळा रोडने गाडी करमाळाच्या दिशेने भरधाव वेगाने घेतली.
चंद्रशेखरला तो गाडी थांबवण्यास सांगत होता. परंतु तो गाडी थांबवत नव्हता. त्याच्या गाडीला तेजसने मागून धडक दिली. त्यानंतर ते कोर्टी शिवारात गेल्यावर त्यांनी पुन्हा जोराची गाडीला धडक दिली तेव्हा चंद्रशेखरचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याची गाडी जोरात झाडाला धडकून खाली गेली. गाडीची एक पलटी होऊन गाडी एका खड्ड्यात जाऊन पडली. तेव्हा त्याचा मित्र पृध्वीराज पाच मिनिटांनी गाडीचा मागचा दरवाजा उघडून बाहेर आला. त्यावेळेस चंद्रशेखर हा ड्रायव्हरसीटवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याच्या कपाळावर जखम होऊन रक्तस्राव होत होता. त्यानंतर तो रोडवर गेला तेव्हा रोडवर येणारे जाणारे लोकांनी तेथेच बाजूला राहणारे लोक तिथे जमा झाले. तेव्हा तेजस काळे हा त्याची कारमधून उतरून लोखंडी पाईप हातात घेऊन उभा होता. तेथे तो म्हणत होता की मी चंद्रशेखर जाधवची गाडी ठोकली आहे. त्याला जीवे मारणार आहे. दरम्यान तो त्याची कार घेऊन तिथून निघून गेला. तेथे जमलेल्या नागरिकांनी चंद्रशेखरला गाडीतून बाहेर काढत रुग्णवाहिका बोलवून रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यात त्याचा मृत्यू झाला. चंद्रशेखरचा मित्र पृथ्वीराजच्या सांगिलेल्या माहितीवरून जाधव यांनी फिर्यादीत ही माहिती दिली आहे.
