सोलापूर : जिल्हा परिषदेच्या जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह व सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहामध्ये २०२४- २५ मध्ये अकरावी ते पदवीधरपर्यंत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी १५ ते २० जुलैपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख यांनी केले आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख म्हणाले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह पार्क चौक सोलापूर येथे मुलांसाठी व सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह शेळगी येथे मुलींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर दोन्ही वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या zpsolapur.gov.in या संकेतस्थळावरील सूचनांचे वाचन करुन प्रवेश फार्म भरुन वसतिगृहात द्यावयाचा आहे.
करमाळा पुरवठा शाखेत मन्युष्यबळाची पूर्तता करण्याचा प्रयत्न सुरु! नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज
प्रवेश अर्जाची छाननी २२ जुलै ते २४ जुलै कालावधीत आणि प्रवेश मान्य विद्यार्थी- विद्यार्थीनींची यादी २५ ते २६ जुलै दरम्यान जाहीर केली आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरु विद्यार्थी वसतीगृहासाठी मुलांना ७ हजार १०० रुपये व सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृहामध्ये मुलींसाठी ६ हजार १०० रुपये प्रवेश शुल्क व अनामत रक्कम चलनाद्वारे २९ ते ३१ जुलै या कालावधीत भरावयाचे आहे. त्यानंतर १ आॕगस्टपासून प्रत्यक्ष वसतीगृह सुरू होऊन ३१ मे २०२५ पर्यंत सुरु राहणार असल्याचेही शिक्षणाधिकारी शेख यांनी सांगितले.
का ओ होनराव साहेब असं केले? करमाळा एसटी आगारावरील विश्वास उडत आहे काय?