कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा ‘असा’ असणार करमाळा दौरा

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे उद्या (शुक्रवारी) करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या दौर्यावर येत आहेत. पुणे येथून ते सकाळी 8 वाजता निघणार आहेत.

टेंभुर्णीमार्गे ते करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथे येणार आहेत. दुपारी 12 वाजता ते संत वामनभाऊ भगवानबाबा मंदिराच्या समोरील सभागृहाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यावेळी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदर जयवंतराव जगताप हे उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *