चिखलठाण : वांगी नंबर दोन येथील अजिंक्य तकीकची जवहर नवोदय विद्यालय पोखरापुर येथे निवड झाली आहे. त्याने जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले आहे. एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या नवोदय प्रवेश परिक्षेत उत्तम गुण मिळवून नवोदय विद्यालय पोखरापुर येथील प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक तसेच विविध क्षेत्रातील मंडळींकडून त्यांचे कौतुक होत आहे.

