करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा करमाळा दौरा झाला. आमदार शिंदे यांना बळ देण्याचा प्रयत्न यावेळी झाला. माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे या दौऱ्यात नाव होते मात्र ते अनुपस्थित होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री पवार हे पहिल्यांदाच करमाळ्यात आले होते. दरम्यान त्यांनी कोणावरही टीका न करता ‘शरद पवार हेच आमचे दैवत’ असल्याचे सांगत या दौऱ्यात ते जबरदस्त खेळी खेळले आहेत.

करमाळा विधानसभा मतदारसंघात माढा तालुक्यातील ३६ गावे आहेत. माढा व करमाळा येथे शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. करमाळा मतदारसंघात संजयमामा शिंदे यांची लढत माजी आमदार नारायण पाटील यांच्याशी होणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. ते मोहिते पाटील समर्थक आहेत. आमदार शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पहिल्यापासून नेते मानतात. गेल्या निवडणुकीत शिंदे हे अपक्ष रिंगणात उतरले होते. त्यांना विजयी करण्यात अजित पवार यांचाच मोठा वाटा होता असे सांगितले जाते. त्यात त्यांची खेळी यशस्वी झाली होती.

करमाळ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, अप्पासाहेब झंजुर्णे, तालुकाध्यक्ष संतोष वारे आदी नेते आहेत. गुळवे व झंजुर्णे तालुका पातळीवर आमदार शिंदे यांचे समर्थक आहेत. (राष्ट्रवादी फुटीच्या आधी) अनेकजण आमदार शिंदे यांचे समर्थक शरद पवार यांना मानतात. त्यामुळे शरद पावर यांच्यावर झालेली टीका त्यांना सहन होत नाही. आमदार शिंदे यांनी या निवडणुकीत अपक्ष उतरावे अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. ते अपक्ष राहिले तर त्यांचे जुने व नवे समर्थक मदत करू शकतात, असे समीकरण येथे आहे. त्यात अजित पवार यांनी येथे येऊन कोणावरही टीका केली नाही. आणि ‘शरद पवार हेच आमचे दैवत’ असल्याचे सांगत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार शिंदे यांना आपण निधी दिला आहे, आणखी निधी देणार आहे, संजयमामा यांना आमदार करा’ असे त्यांनी सांगितले. हेही उपमुख्यमंत्री पवार यांची खेळी मानली जात आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार शिंदे हे एकनिष्ठ आहेत. ते कामाचे आहेत असेही यावेळी सांगितले.

माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे या दौऱ्यात नाव होते. मात्र ते अनुपस्थित राहिले होते. याचीही चर्चा झाली. पण गेल्या काही दिवसातील चित्र पाहिले तर ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते एकत्र राहतील की नाही याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असते. अशा स्थितीत पवार यांच्या जेवणाची व्यवस्था सावंत यांच्या कुटुंबीयांकडे केली होती. साधारण एक तास अजित पवार हे त्यांच्या घरी होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर व आमदार शिंदे यांनी तेथे एकत्र जेवण केले. त्यानंतर तटकरे व चाकणकर हे बाहेर आल्यानंतर सुनील सावंत, ऍड. राहुल सावंत व संजय सावंत यांच्याशी त्यांनी बंददाराआड चर्चा केली. यावेळी आमदार शिंदे हेही उपस्थित होते. या चर्चेमुळे सावंत यांना आणखी बळ दिले जाऊ शकते अशी चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांच्यासाठीही करमाळ्याची जागा महत्वाची आहे. त्यामुळे ते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. सावंत यांच्याशी झालेला संवाद आणि शिंदे व शरद पावर यांच्याबद्दल केलेले विधान ही त्यांची खेळीचं मानली जात आहे. आदिनाथ व मकाईबाबतही त्यांनी विधान केले.

मराठा व धनगर समाजाचे निवेदन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धनगर समाज बांधवानी झरे फाटा येथे तर मराठा समाज बांधवानी करमाळ्यात सावंत कुटुंबीय येथे निवेदन दिले. मराठा समाज बांधवानी आरक्षणासाठी व करमाळ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निवेदन दिले.

जेवण होताच पाऊस
उपमुख्यमंत्री पवार यांचे जेवण होताच पुढील दौऱ्यासाठी निघाले. मात्र लगेच जोरदार पाऊस सुरु झाला. या पावसामुळे त्यांना हेलिकॅप्टरने जाता आले नाही. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हेलिकॅप्टर ठेऊन बायकार बारामतीला जाणे पसंद केले. यावेळी आमदार शिंदे हे देखील त्यांच्याबरोबर गेले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *