करमाळा (सोलापूर) : ‘नदीच्याकडेला स्वतःच्या क्षेत्रात विहीर खोदता येत नाही’, असा अजब कयास करमाळा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने लावला आहे. रोजगार हमी योजनेत मंजूर झालेली विहिरी करण्यास त्यांनी लाभार्थ्याला अडथळा आणला असून याला करमाळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी हे बळ देत असल्याची चर्चा आहे. ‘आपण किती स्वछ आहे,’ हे दाखवण्याचा मोबाईलवर स्टेट्स ठेऊन केविलवाणा ते प्रयत्न करत आहेत. आशा कर्मचाऱ्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.
करमाळा पंचायत समितीत विहिरीच्या कामात गटविकास अधिकाऱ्यांची मनमानी! कर्मचाऱ्याला हाताशी धरून शेतकऱ्यांच्या कामाला अडथळा
करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री येथील एका शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेतून विहीर मंजूर झाली. सबंधित शेतकऱ्याचे क्षेत्र हे सिना नदीच्या कडेला आहे. त्याच्या क्षेत्रात त्याला विहीर घ्यायची आहे. मात्र तांत्रिक अधिकारी विवेकानंद फाळके हे तेथे विहीर घेता येत नाही असे सांगत आहेत. याबाबत त्यांना लेखी आदेश मागवला मात्र त्यांनी त्याची पूर्तता केलेली नाही. हा प्रकार प्रभारी गटविकास अधिकारी भोंग यांना सांगण्यात आला. मात्र त्यानीही यामध्ये ठोस निर्णय घेतला नाही. दरम्यान आज (सोमवारी) फाळके आणि भोंग यांनी एक पत्र सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘सिंचन विहीर खोदकामासाठी निश्चित केलेली जागा स्वतच्या मालकीची आहे. परंतु सदरील जागी सिना नदीच्या पाणी प्रवाहमुळे टी जागा नदी पत्रात येते. आशा स्थितीत सरकार निर्णयात कोणत्याही सूचना नाहीत.’ असे असताना फाळके यांनी विहीर कोणत्या नियमांच्या आधारे आढवली आहे. हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराला भोंग पाठीशी घालत आहेत.
लाभार्थीचे क्षेत्र नदीच्या कडेला आहे हा शेतकऱ्याचा गुन्हा आहे का? अधिकार दिल म्हणून फाळके सारख्या अधिकाऱ्याने त्याचा दुरुपयोग करून अडवणूक करणे हे योग्य आहे का? हा प्रश्न आहे. आणि गटविकास अधिकारी भोंग हे फक्त करगदावर सहीच करतात की बाकी वस्तुस्थिती पाहतात? हा प्रश्न निर्माण होत आहे.
फाळके यांनी यापूर्वी अनेक विहिरी बेकायदा केल्या त्याचे पुरावे आहेत. असे असताना बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सबंधित पत्रकाराला मोबाईलवर स्टेट्स ठेऊन बदनाम करत आहेत. त्यांची त्वरित चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यामध्ये सबंधित जबाबदार अधिकाऱ्यानी यामध्ये लक्ष घालून फाळकेला समज द्यावी.