करमाळा (सोलापूर) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठच्या वतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील बिटरगाव श्री व खडकी येथील शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हे बियाणे वाटप करण्यात आले. सप्टेंबरमध्ये सीना नदीला महापूर आला होता. यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना मदतीची आवश्यकता आहे.
करमाळा तालुक्यातील खडकी, आळजापूर, तरटगाव, बाळेवाडी, बिटरगाव श्री, पोटेगाव, निलज, पोथरे, बोरगाव, आवाटी या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले होते. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठच्या वतीने पूरग्रस्त बाधित कुटुंबियांना दिवाळीपूर्वी किराणा किट देण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना बियाणे व दिवाळी फराळही देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
