करमाळा (अशोक मुरूमकर) : राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) करमाळा तालुकाध्यक्षपदी अमरजित साळुंखे यांची वर्णी लागली आहे. महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने ही निवड जाहीर झाली आहे. साळुंखे हे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे समर्थक आहेत. विधानसभा निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांचे त्यांनी ताकदीने काम केले होते.
लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांची भाजपने उमेदवारी डावलून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने तेही नाराज होते. या नाराजीतून त्यांनी भाजपच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीचे काम केले होते. सामाजिक कामातही ते अग्रेसर असतात. या निवडीनंतर माजी तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनीही त्यांचे अभिनंदन केले. साळुंखे यांनी ‘तालुक्यात राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद पवार यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे’ सांगितले आहे.