शाहूवाडी तालुक्यातील आंबा घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. घाटातील रस्त्याकडील कठडे, मोऱ्या पडल्या आहेत. त्यामुळे आंबा घाटातील अवझड वाहतूक धोकादायक बनली आहे.
कोल्हापूर – रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटातून कोकणात जाण्यासाठी नेहमी अवजड वाहतूक सुरु असते. तळकोकणात जाण्यासाठी आंबा घाटातून जाणारा हा एकमेव मार्ग आहे. आंबा घाट मार्गाचे एकूण अंतर पाच किलोमीटर असून घाटातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. घाटातील संपूर्ण रस्ता उखडला आहे. रस्त्यात मोठ मोठे खडडे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास होत आहे. या खड्ड्यांमुळे घाटात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटातील रस्त्याकडेला असणा-या साईडपट्टया उखडल्या आहेत, तसेच या संपूर्ण रस्त्याचे संरक्षक कठडे पडले आहेत. संरक्षक कठडे नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.