करमाळा (अशोक मुरूमकर) : अंबालिका साखर कारखान्याने यावर्षी साधणार १८ लाख मे. टन ऊस गळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी ऊस तोड यंत्रणा सक्षम करण्यात आली असून यापूर्वी शेतकऱ्यांनी जसा विश्वास ठेवला आहे तसाच विश्वास २०२५- २६ या ऊसतोड गाळप हंगामातही ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कारखान्याकडे साधणार २३ हजार हेक्टर ऊस नोंद झाली असून त्यातील साधारण २० हजार हेक्टर ऊसाचे गाळप करेल, असा अंदाज आहे. कारखान्याकडे ऊसतोड वाहतूकीचे ट्र्क व ट्रॅक्टरचे ७८१, ट्रॅक्टर गाडीचे ७९३, हार्वेस्टर ४४ व टायर बैलगाडीचे २७७ करार झाले आहेत. ऊस गाळपासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. सध्या पावसाने उघडीप देणे आवश्यक आहे.
गेल्यावर्षी कारखान्याने ऊस गाळप झालेल्या शेतकऱ्यांना टनाला ३००० रुपये दर दिला आहे. याबरोबर शेतकऱ्यांना यंदा साखरही दिली आहे. कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालन अधिकारी जे. एन. वाघ, केन मॅनेजर व्ही. बी. भोसले, मुख्य शेतकी अधिकारी संदीप चाकणे, ऊस पुरवठा अधिकारी प्रताप गायकवाड यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
अंबालिका कारखान्याकडे करमाळा तालुक्यातील सीना काटाच्या खडकी, बिटरगाव श्री, आळजापूर, पोथरे, बाळेवाडी आदी गावांसह मांगी, रावगाव, वडगाव, पुनवर या गावातून मोठ्याप्रमाणात ऊस गाळपाला जात आहे. याशिवाय चिखलठाण, कोंढारचिंचोली, वाशिंबे या भागातूनही या कारखान्याला ऊस गाळपासाठी जातो. कारखान्याकडून वेळेला पैसे आणि चांगला दर मिळत असल्याने या कारखान्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ म्हणून या भागात यंत्रणा सक्षम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
