करमाळा (सोलापूर) : शिंदे हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रकांत चुंबळकर यांच्या कुटुंबाकडून शिंदे हॉस्पिटलला (काल) रुग्णवाहिका सायकल भेट देण्यात आली आहे. चंद्रकांत चुंबळकर व प्रमिला चुंबळकर या चुंबळकर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी व रुग्णाविषयी आपुलकी तसेच आपल्या हातून सेवाभावी कार्य व्हावे म्हणून शिंदे हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णासाठी सायकल भेट दिली आहे. यावेळी डॉ. दयानंद शिंदे, डॉ. चेतना शिंदे, डॉ. प्रफुल्ल पवार, गुणवंतराव शिंदे यांनी चुंबळकर परिवाराचे आभार मानले.
